Friday, November 28, 2008

दहशतवाद्यांची 'मराठी बोली'?

दहशतवाद्यांची 'मराठी बोली'?

28 Nov 2008, 0204 hrs IST टीम मटा ।

मुंबई

एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह तिघा वरिष्ठ पोलिस अधिका-यांची हत्या करणारे ‘ कामा हॉस्पीटल ’ मध्ये बुधवारी रात्री घुसलेले दहशतवादी अस्खलित मराठीत बोलत होते... कामाच्याच एका कर्मचा-याने ही माहिती दिल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. ' कामा' हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री घुसलेल्या दहशतवाद्यांनी तेथील दोघा वॉचमनवर गोळ्या झाडल्यानंतर तिथेच जवळ असलेल्या व युनिफॉर्ममध्ये नसलेल्या तिस-या कर्मचा-याच्या पोटाला एके-४७ रायफल लावून 'तू इथे काम करणारा कर्मचारी आहेस का', असे अस्खलित मराठीत विचारल्याचे कळते. त्यावर कर्मचा-याने अतिरेक्यांचे पाय धरले आणि 'मी येथे काम करीत नाही... हार्टअॅटॅक आलेल्या माझ्या पत्नीला येथे अॅडमिट केले आहे', असे सांगितले. तेव्हा 'खरे सांगतो का खोटे' असे दहशतवाद्यांनी दरडावून विचारले. त्यावर 'नाही साहेब, आईशप्पथ खरे सांगतो', असे उत्तर दिल्याने दहशतवाद्यांनी त्याला सोडून दिल्याचे कळते. ही माहिती याच कर्मचा-याने कामा हॉस्पिटलचे अधिकारी आणि आरोग्य खात्याला दिली. दहशतवादी अस्खलित मराठी बोलत असल्याचे कळल्याने पोलिस चक्रावले आहेत. याच तीन दहशतवाद्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे तसेच विजय साळसकर यांची हत्या केल्याचे समजते. कारवाईला वेळ का? दरम्यान, दहशतवादीविरोधी कारवाईची सगळी सूत्रे एनसएसजीचे डायरेक्टर जनरल हलवत असून ओबेरॉय, ताज आणि नरीमन बिल्डिंग येथे मोठ्या प्रमाणात नागरिक असल्याने त्यांना इजा होऊ नये, याची खबरदारी घेत कारवाई केली जात असल्याने अतिरेक्यांविरोधातील कारवाईला वेळ लागत आहे. दहशतवाद्यांना हुसकावून लावल्यानंतर एनएसजीचे कमांडो हॉटेलांचा एकएक मजला रिकामा करीत आहेत, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3767093.cms

No comments: